विद्यार्थी व पालकांनो, महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी खास निर्माण केलेल्या या वेब स्थानी आपले सहर्ष स्वागत आहे. आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांची तयारी करण्याच्या माझ्या कोर्सेस बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला ह्या विशेष वेबपेजवर मिळेल. डोंबिवली येथे गेली १८ वर्षे उन्मेष इनामदार कला अकॅडमी मी चालवत असून आजवर डोंबिवलीतीलच नव्हे तर दूर दूरच्या ठिकाणांहून शेकडो विद्यार्थ्यांनी माझ्या वर्गातून तयारी करून आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत उज्जवल यश संपादन केले आहे.काही तर या परीक्षेत राज्यात प्रथमही आलेले आहेत. अनेक परगावातील विद्यार्थी माझ्या वर्गात प्रवेश घेतात. त्यासाठी ते डोंबिवलीत किंवा जवळपास स्वतःची तात्पुरती राहाण्याची सोय करतात. परंतु तरीही माझ्या या वर्गात विद्यार्थी संख्या मर्यादित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना निराश व्हावे लागते. मला जाहीर करण्यास आनंद होतो आहे की या वर्षापासून हाच अभ्यासक्रम ऑनलाईन कोर्सद्वारा मी सुरू करीत आहे. त्यामुळे दूरस्थ विद्यार्थ्यांना सुद्धा या वर्गात प्रवेश घेऊन उत्तम प्रकारे परीक्षांची तयारी करता येईल. हा अभ्यासक्रम परिपूर्ण व सर्वसमावेशक तर असेलच परंतु दूरस्थ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. इंटरनेट व ई मेल या माध्यमातून शिकवताना त्यांना विषय व त्या अनुषंगाने दिलेल्या सूचना समजण्यात कोणतीही अडचण येऊ नये याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. भाषिक अडचण येत असल्यास मराठीतूनही सूचना अवश्य दिल्या जातील. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्याच्या घरात हे शिक्षण मिळणार असल्याने विद्यार्थ्याचा प्रवास व तसेच बाहेर राहाण्याची सोय करण्याचा त्रास व खर्च तर वाचेलच शिवाय घरातच हा अभ्यास चालणार असल्याने पालकांनाही त्यात लक्ष घालता येईल. बरेच विद्यार्थी अनेक करिअर ऑप्शन्स ठेवण्यासाठी इंजिनियरिंग CET तसेच AIEEE परीक्षा यांच्याही वर्गांना जात असतात. यासर्व क्लासेसच्या वेळांचे नियोजन करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. अशा वेळी आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांची तयारी करण्याच्या ह्या ऑनलाईन कोर्सचा अभ्यास आपल्या वेळेनुसार केंव्हाही करता येईल.विद्यार्थ्यांना पाठवलेल्या तज्ज्ञ सूचना, प्रात्यक्षिके, प्रतिक्रिया या संगणकात जतन झालेल्या असल्याने विद्यार्थी त्या पुनः पुन्हा केंव्हाही पाहून त्या नुसार काम करू शकेल. पालक व विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात घ्यावे की या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन सूचना, प्रात्यक्षिके, त्याच्या कामाचे परीक्षण व मार्गदर्शन फक्त मी स्वतः करणार आहे. यासाठी इतर कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन कोर्समध्येसुद्धा विद्यार्थीसंख्या मर्यादितच असणार आहे. या वर्षी म्हणजे फेब्रु.२०११ मध्ये HSC परीक्षा देणार्या तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या वर्गात प्रवेश घ्यावा. १ ऑक्टो.२०१० पासून हा कोर्स सुरू होत आहे. जितका आधी प्रवेश घेतला जाईल तितका जास्त अवधी विद्यार्थ्यांना तयारीसाठी मिळेल. कारण ही परीक्षा पूर्णपणे प्रॅक्टिकल असते. तेंव्हा विद्यार्थी व पालक मित्रांनो, लवकर निर्णय घ्या. उत्तम करिअरसाठी आपणाला माझ्या शुभेच्छा! आपल्या मनातील शंका / अडचणी आपण खाली असलेल्या Comments मध्ये मला विचारू शकता. त्यांना जरूर उत्तर दिले जाईल. या ठिकाणी आल्याबद्दल आभार.


No comments:
Post a Comment