29 September 2012

महत्त्वाच्या सूचना.

कृपया प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी पुढील सूचना लक्षपूर्वक वाचा.

 १. हा कोर्स महाराष्ट्रातील सरकारी तसेच खासगी महाविद्यालयातील आर्किटेक्चरच्या ५ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणार्‍या  समायिक प्रवेश परीक्षांना बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठीच आहे.

 २. या परीक्षांच्या अभ्यासात ड्रॉईंग व स्केचिंग यांना अतिशय महत्त्व असून विद्यार्थ्याची ड्रॉईंग व स्केचिंग करण्याची क्षमता वाढणे जरूरीचे आहे. त्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार दररोज भरपूर सराव करणे आवश्यक आहे.

 ३. विद्यार्थ्यांनी नियमित व पुरेसा सराव सातत्याने करणे आवश्यक आहे. हा कोर्स तीन महिन्यांपेक्षा कमी काळात पूर्ण करता येणार नाही. दररोज कमीत कमी ५ तास सराव होणे आवश्यक आहे.

 ४. एका ई मेल पत्त्यावर फक्त एकाच विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्याने आपला ई मेल पासवर्ड दुसर्‍या कोणालाही देता कामा नये. प्रत्येक विद्यार्थ्याने केलेले काम  श्री. उन्मेष इनामदार स्वतः  तपासणार असून त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, प्रत्यक्षिके, टिपणे इ. देणार आहेत. त्यासाठी इतर कोणाही व्यक्तीस / मदतनीस नियुक्त केलेले नाही.

 ५. विद्यार्थ्याला पाठविलेल्या मार्गदर्शक सूचना, टिप्पणे, प्रात्यक्षिके इत्यादी हे त्याच्या वैयक्तिक अडचणी व कुवतींचा विचार करून दिलेले असते. ते मार्गदर्शन इतर विद्यार्थ्यांना लागू असेलच असे नाही. या कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या वैयक्तिक अभ्यासासाठी ते दिलेले असते. कोणत्याही प्रकारे त्याचा गैरवापर किंवा व्यापारी वापर करण्यास किंवा अशा कामासाठी ही माहिती कोणालाही पुरविण्यास सक्त मनाई आहे. या कोर्सला प्रवेश घेतलेला एखादा विद्यार्थी/विद्यार्थिनी जर हा कोर्स चालू असताना किंवा त्याचा हा कोर्स संपल्यानंतर असे कृत्य करताना आढळला/ आढळली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा विद्यार्थ्याचा प्रवेश कोणतीही फी परत न करता त्वरित रद्द केला जाईल.

६. विद्यार्थ्याचे जर या कोर्समध्ये केलेल्या मार्गदर्शनाने समाधान होत नसेल तर मार्गदर्शन सुरू केलेल्या दिवसापासून २१ व्या दिवसापर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) कोर्सची भरलेली संपूर्ण फी कोणतीही कपात न करता परत केली जाईल. यासाठी प्रवेश रद्द करीत असल्याची सूचना प्रवेश रद्द करण्याच्या किमान सात दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. २१ दिवसानंतर विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यास कोणतीही फी परत केली जाणार नाही. कोर्सची संपूर्ण फी एका हप्त्यातच भरावयाची आहे.संपूर्ण फी चेकने किंवा रोखीने भरल्यानंतरच विद्यार्थ्याला पहिला लेसन / लॉग ऑन पासवर्ड पाठविला जाईल.

७. या कोर्स मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात असल्याने व एका वेळी एकाच विद्यार्थ्याशी संवाद साधला जात असल्याने विद्यार्थी संख्या मर्यादित आहे.

८. या कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याजवळ त्याने केलेले काम संगणकाद्वारे मार्गदर्शकांना सादर करण्यासाठी एक चांगल्या प्रतीचा स्कॅनर (ए४ साईझ) असणे आवश्यक आहे.

९. विद्यार्थ्याने दिलेले काम स्वतःच करून  दिलेल्या वेळेवर सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी आठवड्यातून किंवा दिवसातून कितीही वेळा मार्गदर्शनासाठी त्याने केलेले काम पाठवू शकतो.

१०.प्रत्येक विद्यार्थ्याने केलेले काम आठवड्यातून कमीत कमी ४ वेळा तपासून त्याचे समाधान होईल अशा मार्गदर्शक सूचनांसह त्याला पाठवले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याकडून आठवड्यातून कमीत कमी ४ सबमिशन्स अपेक्षित आहेत. प्रत्येक सबमिशनमध्ये विषयानुसाएर १ ते १० पेपर शीट्स असू शकतात.

११. विद्यार्थ्याला संपूर्ण मार्गदर्शन त्याच्या परीक्षेच्या दिवसापर्यंत दिले जाईल. तत्पूर्वी शेवटच्या सेशनमध्ये विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचे १० टेस्ट पेपर्स दिले जातील. विद्यार्थ्याने ते अंतिम परीक्षेनुसार दिलेल्या सूचनांनुसार व दिलेल्या वेळेत पूर्ण करावयाचे आहेत.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. हा कोर्स आता ४ वर्षांचा झाला आहे, तर अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे की आधीच्या वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये तो समाविष्ट केला आहे? ?

    ReplyDelete
  2. गेल्या काही वर्षांपासून हा कोर्स ४ वर्षांचा होणार असे म्हटले जाते आहे. परंतु तशी अधिकृत अधिसूचना विद्यापीठाकडून अद्याप काढली गेलेली नाही.

    ReplyDelete